सेवा संकल्प परिवाराने वाचविले नवजात स्त्री अभ्रकाचे प्राण

    दिनांक :02-May-2021
|
चिखली,
एक जीव वाचवण्याचं समाधान खूप वेगळं असतं याची अनुभूती पळसखेड येथील निराधारांचा संभाळ करणार्‍या सेवा संकल्प परिवाराने घेतली. गुरुवार रात्री सेवासंकल्प वरील 120 बेवारस माता बांधव शांत निजलेले होते.तशी शांतता हा सेवासंकल्प चा स्थायी भाव नाही, कायम गलक्यात राहणारा परिसरात शांतता होती. तेवढ्यात प्रकल्पावरील कुत्र्यांनी एकच गलका चालू केला. एरवी भुंकून भुंकून ते शांत बसतात ते शांत होत नसल्यामुळे सेवा संकल्पाचे संचालक नंदकुमार पालवे बाहेर आले कुत्रे गेट कडे पाहून भुंकत होते जंगली श्वापद असावे अशी शंका त्यांना आली होती.
 
ghy_1  H x W: 0
 
गेट च्या आडोश्यातून डोकावून पाहिलं तर कापडी पिशवीत एक नवजात अर्भक आटापिटा करतांना दिसले दोन्ही हातांच्या ओंजळीत बसावं एवढासा तो मांसाचा गोळा श्वास घेण्यासाठी तडफडत होता. सर्व सेवा संकल्प प्रकल्प काही क्षणात जागा झाला आणि पळापळ सुरू झाली, सेवासंकल्प च्या दवाखान्यात पुरेसे साहित्य उपलब्ध नव्हते, आणि नवजात बाळ येण्याची ही पहिली वेळ असल्याने अनुभव ही नव्हता. मात्र सेवासंकल्प चे निवासी डॉ. शिवानंद साखरे यांच्या प्रसंगावधनाने त्या बाळाचा कंठ मोकळा करण्यात थोडं यश आलं आणि तातडीने त्या बाळाला दवाखान्यात न्यायची लगबग सुरू झाली.
 
 
प्रकल्पाच्या संचालिका आरती पालवे यांनी बाळाला सांभाळले, कुठे जखम आहेत का हे पाहण्यासाठी बाळाच्या अंगावर च काढायचा प्रयत्न केला नंतर ते स्त्री जातीचं अर्भक आहे हे आरती पालवे यांनी सांगितले त्वरित सदर नवजात अभ्रकाला घेऊन चिखली येथील रुग्णालयात डॉ. शिवशंकर खेडेकर व डॉ. सौ. सविता अभिमन्यू शिंदे यांच्या सहकार्याने बाळावर तातडीने उपचार सूरु करण्यात आले डॉ. शिवशंकर खेडेकर यांच्या संतकृपा बालरुग्णालयात बाळाला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आलेबाळाला आवश्यक ते सर्व उपचार करून बाळाला पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या मार्फत बालकल्याण समिती बुलडाणा यांच्या स्वाधीन केले.
 
 
फिर्यादी नंदकुमार पालवे यांचे लेखी रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन, अमडापुर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रविण सोनवणे व पो. कॉ. गजानन राजपुत करीत आहे. सदर
अर्भकाबाबत काही माहीती मिळाल्यास पोलीस स्टेशन, अमडापुर येथे तात्काळ कळवावे असे आवाहन ठाणेदार वानखडे पोउपनि.प्रविण सोनवणे साहेब व पो. कॉ. गजानन राजपुत यांनी केले आहे.