वर्धेकरांच्या करुण रुदनाने देवळीकरांना हुंदका!

    दिनांक :02-May-2021
|
- मृताच्या नातेवाईकांचा देवळीत हंबरडा
  
संतोश बियाला
देवळी ,
वर्धेतील स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे 26 एप्रिलपासून वर्धेतील कोरोना मृतकांवर देवळीतील मोक्षधामामध्ये अन्त्यसंस्कार करण्यात येत आहे आहेत. 1 रोजी वर्धेतील विशीतील कोरोना मृतकावर अन्त्यसंस्कार करतेवेळी नातेवाईकांच्या करुण रुदनाने देवळीकरांचे सुद्धा डोळे पाणावले.
 
dhjhj_1  H x W:
 
देवळी येथील मोक्षधामामध्ये वर्धेतील रोज आठ दहा कोरोना मृतकांवर अन्त्यसंस्कार करण्यात येत आहेत. 2 मे पर्यंत वर्धेतील 55 मृतकांवर अन्त्यसंस्कार करण्यात आले आहे. मृतकांच्या मोजक्या नातेवाईकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असते. देवळीतील स्मशानभूमी ही शहरानजीकच असल्याने शोकप्रसंगात देवळीकर दुरून का होईना भागीदार होतात.
 
 
वर्धेतील स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत असल्याने कोरोना बाधितांचे प्रेत रुग्णालयात पडून राहत होते. अन्त्यसंस्कारासाठी एक-दोन दिवसाची प्रतीक्षा करावी लागत होती. या भीषण स्थितीचा अंदाज येताच खा. रामदास तडस यांनी ताबडतोब आवश्यक कार्यवाही करून देवळीची स्मशानभूमी उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाला 22 रोजी कळविले. जिल्हा प्रशासनाने लगेच देवळी स्मशानभूमीचे अधिग्रहण करून प्रतीक्षेत असणार्‍या कोरोना मृतकांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. या निर्णयाने वर्धा स्मशानभूमीमध्ये असणारी रांग कमी होण्यास मदत झाली. मृतकाच्या दाहसंस्कारासाठी प्रशासनाला अडीच हजार रुपये खर्च येतो. अशा कठीण प्रसंगी वर्धेच्या सर्वात समीप असण्याची जवाबदारी देवळीने उत्कृष्टपणे निभावली अशी उदात्त भावना देवळीवासियांमध्ये सर्वत्र दिसून येते.