अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार 1 जखमी

    दिनांक :03-May-2021
|
- जळकानजीक घटना
मारेगाव, 
अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील जळका या गावाजवळ सोमवार, 3 मे रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. अनिशा शंकर बुजाडे (वय 20, रा. मारेगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव असून विशाल श्रावण भानारकर (वय 25, रा. कोंघारा) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
 
ggghgj_1  H x W
 
दोघेही एमएच29 बीएन2406 या दुचाकीने यवतमाळ दिशेने जात होते. दरम्यान मागवून भरधाव वेगात येणार्‍या अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात अनिशा बुजाडे हिला करंजी येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान अनिशाचा मृत्यू झाला. तर विशाल भानारकर हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आले.