यवतमाळात 5698 अहवाल कोरोनामुक्त

    दिनांक :03-May-2021
|
- सोमवारी 1399 बाधित : 1161 मुक्त : 28 मृत्यू
यवतमाळ,
मागील 24 तासांत यवतमाळ जिल्ह्यात 1399 जण नव्याने कोरोनाबाधित तर 1161 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युंसह एकूण 28 मृत्यू झाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागानुसार सोमवारी एकूण 7097 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 1399 जण नव्याने बाधित, तर 5698 अहवाल कोरोनामुक्त आले.
 
ggetet_1  H x W
 
सध्या जिल्ह्यात 6701 रुग्ण कोरोनाबाधित असून यापैकी रुग्णालयात भरती 2523, तर गृहविलग 4178 आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णसं‘या 56,159 झाली आहे. 24 तासात 1161 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण सं‘या 48,104 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1354 मृत्युंची नोंद आहे. सध्या जिल्ह्याचा बाधित दर 12.88 असून मृत्युदर 2.41 आहे. सोमवारी कोरोनाबाधित आलेल्या 1399 जणांमध्ये 875 पुरुष आणि 524 महिला आहेत.
 
 
यात यवतमाळ येथील 419, वणी 362, पांढरकवडा 109, दिग‘स 100, घाटंजी 100, दारव्हा 74, नेर 43, पुसद 38, कळंब 29, राळेगाव 28, उमरखेड 27, मारेगाव 23 प्रमुख आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत 4,36,025 नमुने पाठविले असून यापैकी 4,29,230 अहवाल प्राप्त आहेत. त्यापैकी 3,73,071 नागरिकांचे नमुने आतापर्यंत कोरोनामुक्त आले आहेत.