आगीची एक ठिणगी करू शकते लाखोची हानी

    दिनांक :03-May-2021
|
- सावधान राहण्याची गरज
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
उन्हाळा सुरू झाला की, पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू होते. आता मे महिन्याला सुरुवात झाली आहे. उन्हाची चांगलीच वाढली आहे. भूगर्भातील पाणी आटत चालले आहे. विहिरी कोरड्या पडत चालल्यामुळे विहिरीला अशुद्ध पाणी येत आहे. शेत व जंगलातील पाण्याचे स्त्रोत्र आटले आहे. जंगलात किंवा गावात आग लागली तर लहानसी आगीची ठिणगी गावातील अनेक घराची राखरांगोळी करू शकते किंवा वनातील लाखोची वनसंपदा भस्मसात करू शकते. त्यामुळेच आता उन्हाळ्याच्या दिवसात आगीपासून सावधान राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

df _1  H x W: 0 
 
वसंत ऋतुची चाहुल लागताच होळीचा सण हा जवळ आल्यासारखा वाटतो. आपल्याकडे अशी एक म्हण आहे की ‘होळी जळाली अन् थंडी पळाली’. परंतु आता ही म्हण खोटी ठरू लागली आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या ऋतुचा उकाडा जाणवू लागतो. सिंचन सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी धान पीकाची लागवड केली आहे. आतापासूनच जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठीही बोंबाबोंब सुरू झाली आहे. अजून मे, जून दोन महिने उन्हाळ्याचा ऋतू राहणार आहे. आतापासूनच पाण्यासाठी भटकंती तर पूढे काय होणार, असे चित्र दिसायला लागले आहे.
 
सूर्याने आग ओकायला प्रारंभ केला आहे. आता जंगलातील पाण्याचे स्त्रोत्र आटल्यामुळे वन्यप्राणीही गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थासोबत शेतकरी व पशु पालकांच्या पाळीव जनावरांना भक्ष करीत आहे. मानवावरही वन्य प्राणी हल्ले करीत आहेत. जंगलात वनवा पेटला तर आग विझविण्यासाठी कमालीची कसरत करावी लागते. आता जंगलातील पालापाचोळा वाळत चालला आहे. वृक्ष निष्पर्ण झाले आहेत. अशावेळी आगीने रौद्ररूप धारण केले तर कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होऊन वन्यप्राण्यांचीही आगीत होळी होऊ शकते. त्यासाठी आगीच्या लहानशा ठिणगीपासून सावधान राहण्याची गरज निर्माण झाली आहे.