भाजपाच्या श्रीनिवासन् यांनी केला कमल हासन यांचा पराभव

    दिनांक :03-May-2021
|
- 1600 मतांनी मिळवला विजय
चेन्नई, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या रांगेत असल्याचा अविर्भाव बाळगणारे दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांचा कोईम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन् यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला.

natr_1  H x W:  
 
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. कारण, येथून मक्कल निधि मय्यमचे संस्थापक आणि दिग्गज अभिनेते कमल हासन निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासून हासन आघाडीवर होते. मात्र, अखेरीस भाजपाच्या वनाथी श्रीनिवासन् यांनी त्यांना मागे टाकत 1,600 मतांनी विजय मिळवला. श्रीनिवासन् यांना 35 टक्के मते मिळाली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षाची घोषणा करणार्‍या हासन यांनी तामिळनाडूमध्ये तिसरा पक्ष म्हणून जनतेच्या मनात आम्ही घर करू असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु, जनतेने त्यांच्या पक्षाला नाकारले आहे.