फाईलितील योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा

    दिनांक :03-May-2021
|
- आ. कोरोटे यांचे कृषी अधिकार्‍यांना निर्देश
- देवरीत खरीप हंगाम पूर्व आढवा बैठक
तभा वृत्तसेवा
मुल्ला, 
शेतकर्‍यांसाठी शासनाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. योजनेचा लाभ हा शेतकर्‍यांना मिळावा. कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांची भेट घेवून त्यांच्या शेतात वेळो-वेळी जाऊन पाहणी करून आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. शासनाच्या योजना कार्यालयातील फाईलींमध्ये बंद न राहता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणक ही अधिकारी वर्गाची जबाबदारी आहे. शेतकर्‍यांनीही धान उत्पादनावरच अवलंबून न राहता भाजीपाला, फळवर्गीय पिकांचे उत्पादन घेऊन समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन आमदार सहेषराम कोरोटे यांनी केले.
 
gondi_1  H x W:
 
ते देवरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रशिक्षण सभागृहात शुक्रवारी आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकिला देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, देवरी तालुका कृषी अधिकारी जी. जी. तोड़साम, आमगावचे तालुका कृषी अधिकारी एस. एस. जाधव, सालेकसाचे कृषी अधिकारी ए. एल. दुधाने, देवरी पंसचे कृषी अधिकारी सी. बी. सिंदराम, मंडळ कृषी अधिकारी व्ही. एल. कुंभारे, पी. डी. तईकर, कृषी पर्यवेक्षक गायस पांडे, मनोहर जमदाळ यांच्यासह देवरी तालुक्यातील कृषी सहाय्यक उपस्थित होते.
 
 
बैठकीत देवरी तालुक्याचे नियोजन सादरीकरण तोड़साम, आमगावचे जाधव यांनी तर सालेकसाचे नियोजन सादरीकरण दुधाने यांनी केले. बैठकीत कोरोटे यांनी शेतकर्‍यांच्या विविध योजनांवर चर्चा करुण नियोजनाबाबद सूचना व निर्देश दिले. बियाणे, खते यांची उपलब्धता, त्यांचे योग्य नियोजन करणे, पीक प्रात्याक्षीके, कमी कालावधीतील वाण, रब्बी हंगाम क्षेत्रात वाढ करणे, कडधान्य गळती पिके यांची लागवड, गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करुण लाभ देणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजेचा लाभ देणे. जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत प्रत्येक गावात जमीन सुपीकता निर्देशांकनुसार खताचा योग्य वापर करण्यास प्रोत्साहीत करुण जैविक खताचा वापर वाढवीने, एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे. रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूरांसाठी कामाची उपलब्धता करुण देणे, अशा अनेक शेतकर्‍यांच्या योजने विषयी चर्चा करुण आढावा घेत सर्व योजना शेतकर्‍यांच्या शेता पर्यंत पोहचविण्याचे निर्देश दिले. मंगेश वावधने यांनी आमदार कोरोटे यांना कार्यालयतील कर्मचार्‍यांना कोरोनाच्या महामारीत विमा संरक्षण देण्याची मागणी केली. बैठकीचे संचालन कृषी पर्यवेक्षक शिवकुमार योडाम यांनी केले. आभार रजनिश पंचभाई यांनी मानले.