शिरपूर ग्रा.पं.च्या वतीने दूषित पाणी पुरवठा

    दिनांक :03-May-2021
|
शिरपूर,  
संपूर्ण देशामध्ये कोरोनाची महाभयंकर लाट त्यात लोक त्रस्त असतानाच शिरपूर ग्राम पंचायतच्या वतीने मागील काही दिवसा पासुन दुषित पाणी पुरवठा होत असून 90 टक्के गरीब जनता नळाचे पाणी पित असल्याने त्यापासुन जनतेला आजार होऊ शकतात. त्यामुळे सदर नळाचे पाणी योग्य फिल्टर करूण व पिण्याच्या योग्य करावे अशी तक्रार किशोर देशमुख यांनी ग्रापंचायतकडे केली आहे.मागील काही वर्षापूर्वी पाच कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजने मार्फत सदर नळ योजना कार्यान्वित करणात आली.
 
 
pani _1  H x W:
 
परंतु, तत्कालीन सरपंचा पासुनच या कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हे काम व्यवस्थित झाले नाही ठीक ठिकाणी नालीचे पाणी वॉलमध्ये जात असल्याने पाईपमध्ये ही हेच पाणी जाऊन समोरील लोकाना हेच पाणी प्यावे लागत आहे. हेच पाणी पिल्याने ताप, खोकला, डायरिया, मलेरिया, रायफाईड, कावीळ असे आजार होऊ शकतात अगोदरच दवाखान्या मध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने दूषित होत असलेला पाणी पुरवठा व्यवस्थित करून नाल्याजवळील वॉल बाजुला लावावे जेणे करूण शुद्ध पाणीपुरवठा गावातील जनतेला पुरवावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही किशोर देशमुख यांनी ग्रा. प. दिला आहे.