वर्धेकरांसह प्रशासनापुढे कोरोना हतबल?

    दिनांक :03-May-2021
|
- पोलिसांचे फक्त सायरनच
वर्धा,
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे कोरोनाने वर्धा जिल्ह्यातही थैमान घालत आहे. बाधितांचा आकडा आठशपासून हजारापलिकडे तर मृत्यूही अडीच तीन डझनापर्यंत पोहोचला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली. परंतु, संचारबंदीला अमलात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासन साफ अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
 
gjhg_1  H x W:
 
नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाची कसलीही भीती दिसून येत नसल्याने वर्धेकरांपुढे कोरोना हतबल झाल्याचे वाटू लागले आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लावली. त्याच्या अंमल बजावणीसाठी जिल्हा प्रशासनाचे काम नामधारीच ठरत आहे. नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश असताना दुपारी 12, 1 वाजेपर्यंत बाजारापेठ सुरूच दिसून येते.
 
 
पोलिस प्रशासनही नरम भूमिका घेत पोलिस व्हॅनमधून भोपू वाजवत सहकार्य करण्याचे आवाहन करत दूकाने बंद करण्याच्या सूचना करताना दिसून येतात. या आवाहनाला वर्धेकर कुठेही जुमानत नसून सर्व प्रकारची दुकानं बंद असताना दिवसभर सामान्य दिवसांप्रमाणे शहरात वर्दळ दिसून येते. शासनाची त्रि सुत्रीही बाजारातून जवळपास हद्दपार झाल्याचेच दिसून येत आहे. नागरिकांच्या तोंडावर मुखाच्छादन असले तरी दुकानाबाहेर विषाणूनाषक तसेच, हात स्वच्छ करायला साबनही नाही. सामाजिक दूराव्याचे पालन तर नावालाच आहे.