कोरोनारुग्णांनी चौकशीत वेळ वाया घालवू नये

    दिनांक :03-May-2021
|
- त्वरित उपचार मिळणे आवश्यक
यवतमाळ, 
कोरोनाबाधित किंवा कोरोनाबाधित असण्याची शंका असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी येथील शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध आहे की नाही, या चौकशीत वेळ न घालवता सरळ रुग्णालयात घेऊन जावे. रुग्णालय परिसरातील सुपर स्पेशालिटी इमारतीसमोरील फिवर ओपीडीत घेऊन त्या ठिकाणी चिठ्ठी काढून घ्यावी. तपासणी कक्षात जाऊन ऑक्सिजन पातळी तपासून घ्यावी, ऑक्सिजन तपासणी 90 च्या खाली असल्यास तेथील डॉक्टरांना विनंती करून ऑक्सिजन लावून घ्यावे, असे आवाहन कोरोनायोद्धा संतोष ढवळे यांनी केले आहे.
 
gdhfh_1  H x W:
 
ऑक्सिजन 90-95 असल्यास घाबरण्याचे कारण नाही. फिवर ओपीडीमध्ये थांबवून घेतलेल्या रुग्णास 5 ते 6 तासांत बेड उपलब्ध होतोच. कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे बेडसाठी वाट पाहण्याची समस्या निर्माण झाली आहे, ती रुग्ण व नातेवाईकांनी समजून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
 
 
रुग्णाने कोरोना चाचणी केली नसल्यास फिवर ओपीडी इमारतीच्या बाजूला चाचणीची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटात चाचणीचा अहवाल मिळतो. अहवाल कोरोना बाधित आल्यास रुग्णांनी फिवर ओपीडीमध्येच थांबावे. बेड मिळविण्यासाठी घाई करू नये. रुग्णांच्या नातलगांनी फिवर ओपीडीसमोर शिवसेनेने उभारलेल्या ‘आसरा’ या मंडपात थांबावे. विविध वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दुरुस्त झालेल्या, कोविडमुक्त झालेल्या, तसेच रुग्णाचा मृत्यू झाल्यास बेड रिकामे होतात. या रिकाम्या झालेल्या जागी फिवर ओपीडीतील ज्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असते, म्हणजे ऑक्सिजन पातळी 40 ते 60 असते त्यांना प्राधान्यक‘म देण्यात येतो. 90 किंवा 90 च्या वर ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना नंतर बेड उपलब्ध करून दिला जातो.
 
 
ज्या रुग्णाची रॅपिड टेस्ट नकारात्मक आहे, अशा रुग्णांना सारी वॉर्डात पाठविण्यात येते. रॅपिड टेस्टचा अहवाल सकारात्मक असल्यास त्या रुग्णाची खाजगी सुपर स्पेशालिटीत सोय करण्यात येते. ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल सकारात्मक आहे, परंतु प्रकृती चिंताजनक नाही परंतु ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठवले जाते. रुग्ण व त्यांच्या नातलगांचा गोंधळ होऊ नये, त्यांना वेळीच उपचार मिळावे यासाठी संतोष ढवळे यांनी ही माहिती दिली.
 
 
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळावी यासाठी सर्व संबंधित वॉर्डार्ंच्या दारासमोर आरोग्य कर्मचार्‍यांचे नाव व मोबाईल क‘मांकाचे फलक लावण्यात आलेले आहेत. यानंतरही रुग्णांच्या नातलगांना कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी कोरोनायोद्धा संतोष ढवळे यांच्याशी 98504 91749 या क‘मांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी केले आहे.