दिग्रसला 45 ऑक्सिजन बेडचे कोविड केंद्र लवकरच

    दिनांक :03-May-2021
|
- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती
दिग‘स,
दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज कोरोना बाधितांची सं‘या व सोबत मृत्युंचीही सं‘या वाढतच आहे. जिल्हा प्रशासनावर याचा ताण पडत असून या संदर्भात नियोजन करण्यासाठी रविवार, 2 मे रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोविड दक्षता समितीची आढावा बैठक घेतली.
 
hhggjj _1  H x
 
जिल्हाधिकार्‍यांचा दौरा हा नेर, दारव्हा तालुक्यातील कोरोना आढावा घेण्यासाठी होता. दिग‘स तहसील कार्यालयात कोरोनाची आजवरची व पुढील स्थितीवर चर्चा करण्यात आली. तहसीलदार राजेश वझीरे, ठाणेदार सोनाजी आम्ले, तालुका आरोग्य अधिकारी कृष्णदास बानोत, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, नगर परिषद मु‘याधिकारी शेषराव टाले व वैद्यकीय अधीक्षक राजकुमार राठोड या बैठकीत उपस्थित होते.
 
 
येथील ग‘ामीण रुग्णालयात जिल्हाधिकार्‍यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन ग‘ामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीत 30 आणि जुन्या इमारतीत 15 असे एकूण 45 बेडच्या कोविड दक्षता केंद्राचा प्रस्ताव मागविला आहे. ऑक्सिजनसह इतर सुविधायुक्त कोविड केंद्राची उभारणी सध्या स्थिती अत्यावश्यक बाब असल्याने या मागणीला त्यांनी प्राधान्य दिले असून दिग‘सला लवकरच कोरोना दक्षता केंद्र होणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

कोरोना लसीकरणावर भर द्या : जिल्हाधिकारी
कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी लस घेणे आवश्यक आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात शासकीय व उपशासकीय रुग्णालय असलेल्या 4 ठिकाणी 18 वयोगटाच्या वरील सर्व लोकांसाठी लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. काही दिवसांनंतर सर्वच ठिकाणी लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असल्याने लोकांनी लस घ्यावी. लस सुरक्षित व शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवीत असल्याने याबाबतीत आता कोणतीही शंका नको, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले.