हिंगणघाटात कोरोनासह पाणी समस्येचा सामना

    दिनांक :03-May-2021
|
हिंगणघाट , 
शहरातील जनता एकीकडे कोरोना महामारीशी लढा देत असताना संत ज्ञानेश्‍वर वार्डातील जनतेला पाण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. या कोरोना महामारीत जेथे जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला प्राधान्य नाही तेथे या पेटलेल्या पाणीसमस्येकडे लक्ष दयायला पालिका प्रशासनालासुद्धा वेळ दिसुन येत नाही. काही दिवसांपुर्वी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी जगताप यांना निवेदनसुद्धा दिले. परंतु, अजूनही येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही.
 
ur_1  H x W: 0
 
पालिका प्रशासन कोविड महमारिशी लढा देण्यात गुंतले असताना आता या भागातील नगरसेवकसुद्धा हा पेट घेतलेला पाणी प्रश्‍न सोडविण्यास उत्सुक दिसत नसल्याने जनता संतप्त झाल्याचे दिसुन येत आहे. सध्या शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक शहराचे पाणी पुरवठा सभापती असून सुद्धा आजपर्यंत पाणी समस्या जैसे थे आहे. 1 महिण्यापासून नागरिक कोरोना महामारीसह या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.