चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या 'कन्व्हेअर बेल्ट'ला आग

    दिनांक :03-May-2021
|
चंद्रपूर, 
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक 7 आणि 8 दरम्यान असलेल्या कोळसा वाहून नेणाऱ्या 'कन्व्हेअर बेल्ट'ला रविवार, 2 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानाने उर्वरित बेल्ट कापले. त्यामुळे आग पसरली नाही. अन्यथा, आगीने अवघा परिसर आपल्या कवेत घेतला असता.
 

cck_1  H x W: 0 
 
ही आग अर्ध्या-पाऊण तासात आटोक्यात आली. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांना याबाबत विचारले असता, ही आग आटोक्यात आली असून, दोन्ही संच सुरळीत सुरू आहेत. विजनिर्मितीत काहीही अडथळा आलेला नाही. आग कशी लागली, किती नुकसान झाले, याची पाहणी केली जात असल्याचेही त्यांनी तभाला सांगितले.