प्राणवायूसाठी जिप अध्यक्ष गाखरे यांचे गडकरींना निवेदन

    दिनांक :03-May-2021
|
वर्धा, 
वर्धा जिल्ह्याकरिता 55 प्राणवायू कॉन्स्नट्रेटरची मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला असून कारंजा तालुक्यातील अति तीव्र रुग्णांना वर्धा शहरातील सेवाग्राम व सावंगी येथे भरती करावा लागतो. त्यामुळे या दोनही रुग्णालयावर रुग्णाचा भार वाढल्यामुळे रुग्णांना खाटा मिळणासे झालेले आहे. कारंजा (घाडगे) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे तिथे या परिसरातील रुग्णावर प्राथमिक उपचार करवून घेण्यास अडचण निर्माण झालेली आहे.
 
ttgb_1  H x W:
 
कारंजा (घाडगे) भागातील कोविड रुग्णाची वाढत असलेली संख्या व या रुग्णावर वेळीच प्राथमिक उपचार व्हावा यासाठी प्राणवायूची गरज आहे. ग्रामीण रुग्णालय कारंजा (घाडगे) येथील कोविंड केअर सेंटरकरिता 5 तसेच जिल्ह्यातील सर्व 28 प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी 2 याप्रमाणे 56 प्राणवायू कॉन्स्नट्रेटर देेण्याची विनंती जिप अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केली आहे.