जिल्ह्याला दररोज 3 हजार रेमडेसिवीर द्या

    दिनांक :03-May-2021
|
- राणा दाम्पत्याने घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

अमरावती, 
जिल्ह्याला अपेक्षेनुरूप रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसून दररोज 3 हजार इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी खा. नवनीत व आ. रवी राणा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे त्यांची प्रत्येक्ष भेट घेऊन केली आहे. जिल्ह्यातही कोरोनाचे थैमान आहे. सुविधाही जेमतेमच असल्याची दखल घेऊन आणि त्यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी खा. नवनीत व आ. रवी राणा यांनी तात्काळ दिल्लीकडे धाव घेतली.
 
gfgh_1  H x W:
 
 
सोमवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेटून जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली. कोरोना रुग्णांना दिलासा देणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यात आहे. खाजगी रुग्णालयात असणार्‍या रुग्णांना हे इंजेक्शन मिळविताना खूप त्रास होतो आहे. कधी कधी रुग्ण दगावतो सुद्धा. त्यामुळे खाजगी वितरकांना सुद्धा आवश्यक त्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नवनीत यांनी त्यांच्याकडे केली.
 
 
सद्यस्थितीत सन फार्मा, हेट्रो लॅबोरेटरी, सिपला लॅबोरेटरी, झायडस कॅडीला, मायलॉन लॅबोरेटरी आणि जुबीलंट या कंपन्यांचे प्रत्येकी 1200 रेमडेसिवीर आवश्यक असताना अनुक्रमे 440, 2605, 760,96 असे एकून 3904 इंजेक्शन उपलब्ध आहेत आणि 4704 इंजेक्शनचा तुटवडा आहे. ही सर्व आकडेवारी त्यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्यासमोर ठेवली. दररोज 3 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा जिल्ह्याला करावा, अशी विनंती केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.