गोंदिया 675 रुग्णांची कोरोनावर मात

    दिनांक :03-May-2021
|
- नवे 240 बाधित, 9 रुग्णांचा मृत्यू

गोंदिया, 
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर मात करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांत मृतकांचा आकडाही खाली आला आहे. ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे. आज सोमवार 3 मे रोजी 675 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 240 नवे बाधित आढळले. 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
dfgh_1  H x W:
 
जिल्ह्यात आतापर्यंत 34,405 कोरोना बाधित आढळले असून 28,890 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता 4956 सक्रिय रुग्ण औषधोचार घेत आहेत. 3510 बाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. 559 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यात 114, तिरोडा 44, गोरेगाव 27, सालेकसा 5, देवरी 30, सडक अर्जुनी 3, अर्जुनी मोर 8 व अन्य राज्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 274118 चाचण्या करण्यात आल्या. पैकी 37090 चचण्यांचा अहवाल बाधित आला. यात काही रुग्णंचा अहवाल दोनदा बाधित आल्याची नोंद आहे. 4207 तपासणी चाचण्यांचा अहवाल प्रलंबित आहे.