विद्यापीठ पदभरतीला शासनाची मंजुरी

    दिनांक :03-May-2021
|
- कुलसचिव व चार अधिष्ठाता पदांची भरती
- 21 मे पर्यंत अर्जासाठी मुदत
नागपूर, 
नागपूर विद्यापीठाचे कुलसचिवपद सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या पदावर प्रतिनियुक्ती होत असल्याने शिक्षण मंचाने या पदावरील स्थायी नियुक्तीसाठी सातत्याने तगादा लावला असून आता शासनाने कुलसचिव तसेच चार अधिष्ठाता पदांच्या भरतीस मान्यता दिली असून त्यासाठी संबंधित उमेदवारांनी 21 मे पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत.
 
ffh_1  H x W: 0
 
या मंजुरीमुळे आता नागपूर विद्यापीठाला स्थायी कुलसचिव आणि चार अधिष्ठाते नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठाने यापूर्वी देखील कुलसचिव पदासाठी दोनवेळा जाहिरात प्रकाशित केली. त्यापैकी, पहिल्या वेळेस तत्कालिन कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी डॉ. निरज खटी यांची निवड केली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीला नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा विद्यापीठाने जाहिरात दिली. मात्र, कोरोनामुळे टाळेबंदी घोषित झाली आणि पदभरती व नियुक्ती प्रकि‘या मागे पडली.
 
 
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाला विश्वासात न घेता, शासनाने थेट प्रतिनियुक्ती केली. त्यावर शिक्षण मंचाने आक्षेप घेतला व वाद निर्माण झाला होता. यावर विद्यापीठ प्रशासनाने थेट राज्य शासनाकडे पदभरती करण्याचा आग‘ह धरला. त्यावेळी म्हणजे मार्च महिन्यात राज्य सरकारने पदांना मान्यता दिली. त्यानंतर हा प्रस्ताव पदमान्यतेसाठी उच्च शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. आता शिक्षण विभागाने 26 एप्रिलला यासंदर्भात मान्यता दिली. त्यानंतर आता पुन्हा कुलसचिव व चार अधिष्ठाता पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांना 21 मेपर्यंत विद्यापीठाकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत.