धान खरेदीत शासनाची नियोजन शुन्यता

    दिनांक :03-May-2021
|
- खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत खा. मेंढेंचे टिकास्त्र
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
जिल्ह्यात दोन्ही हंगामात धानाचे पीक घेतले जाते. केंद्र शासनाच्या किमान हमी भाव योजनेनुसार जिल्ह्यात धान खरेदी केली जाते. मात्र राज्य शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे जिल्ह्यात शेकडो शेतकर्‍यांचे धान खरेदी करण्यात आले नाही. यामुुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याची टिका जिल्हाधिकारी कार्यालय येथे रविवारी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत खासदार सुकनल मेंढे यांनी केली. बैठकीला पालकमंत्री नवाब मलिक उपस्थित होते. पुढे मेंढे म्हणाले, शेतकर्‍यांना बोनसची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्यात आलेली नाही. शासनाने त्वरित द्यावी, धान खरेदी केंद्रात विविध कारणे दाखवून शेतकर्‍यांचे धान घेतले जात नाही.
 

txc _1  H x W:  
 
त्यामुळे नाईलाजाने शेतकर्‍यांना पडक्या भावात व्यापार्‍यांना धान विकावे लागते. या प्रकारांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होवून कोणताही गैरव्यवहार धान खरेदी केंद्रामध्ये होऊ नये याकडे अधिकार्‍यांनी लक्ष देण्याचेही मेंढे यांनी यावेळी सूचित केले. शेतकर्‍यांना जेव्हा विम्याचा मोबदला देण्याची वेळ येते तेव्हा विमा कंपनी विविध कारणे सांगून शेतकर्‍यांना विम्याचा मोबदला देत नाही. करीता जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांनी विमा कंपन्यांचे अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन आधीच सर्व निकषांवर चर्चा करून अटी व शर्ती निश्चित कराव्या. एक अधिकारी या कामासाठी नेमून संपूर्ण माहिती व प्रशिक्षण त्यांना देणे गरजेचे असल्याचे मेंढे म्हणाले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांची विम्या संबंधी कोणतीही समस्या उद्भवल्यास त्या अधिकार्‍यांसोबत संवाद साधून प्रश्न निकाली लागवण्याचे सूचित केले. 
 
जिल्ह्यामध्ये वीज जोडणीची हजारो प्रकरणे प्रलंबित असून ते निकाली काढण्याच्या सूचना केल्या. कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांमध्ये फळ बागायतीसाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना प्रेरित करावे व त्याचा लाभ मिळण्याकरिता प्रशिक्षण वर्ग घ्यावे सोबतच कोविडच्या काळात मनरेगाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या विविध कामाचे नियोजन करावे. भरपूर प्रमाणात शेततळे, धडक सिंचन योजनेतून बांधलेल्या विहीरींचा लाभ शेतकर्‍यांना लवकरात लवकर देण्याकरिता कार्यवाही करण्यचे निर्देश मेंढे यांनी संबंधित अधिकार्‍यांन दिले. बैठकीला आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. अभिजित वंजारी, आ. सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, मुख्याधिकारी प्रदीपकुमार डांगे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जयराम देशपांडे, सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, सर्व तहसीलदार, गजेंद्र फुंडे, गुड्डू कारडा आदी कार्यकर्ता उपस्थित होते.