चक्रीवादळाने निष्पाप बालकाचा बळी

    दिनांक :03-May-2021
|
- लोणी येथील घटना; तब्बल 50 फूट उंच उडाला पाळणा

आर्णी, 
तालुक्यातील लोणी येथे चक‘ीवादळाने एका दीड वर्षीय निष्पाप बालकाचा बळी घेतल्याची घटना शनिवार, 1 मे रोजी घडली आहे. दुपारी 12 च्या सुमारास लोणी येथे अचानक चक‘ीवादळ सुरू झाले व लोणी येथील सुनील राऊत यांच्या घरावर लोखंडी अँगलला टीनाचे छप्पर होते व त्या अँगलला दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाळणा बांधलेला होता त्या पाळण्यात हे बालक निद्रावस्थेत होते.
 
frd _1  H x W:
 
चक‘ीवादळाने राक्षसी रूप धारण करून घरावरील टीनाचे छप्पर पाळण्यासहित तब्बल पन्नास फूट उंच हवेत फिरविले आणि खाली कोसळले. यामध्ये दीड वर्षाच्या बालकाला गंभीर मार लागल्याने त्याला तत्काळ यवतमाळ येथील रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला. मंथन सुनील राऊत असे मृत बालकाचे नाव असून घटनेची माहिती परिसरात पसरताच हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मंथनला पाच वर्षांची दिव्या नावाची मोठी बहीण असून आई अरुणा गृहिणी आहे. मंथनचे वडील सुनील यांचा मंडप सजावटीचा व्यवसाय असून तोही कोरोनामुळे दोन वर्षांपासून डबघाईस आलेला आहे.