दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरण केंद्रावर त्वरित लस द्या

    दिनांक :03-May-2021
|
- जिल्हा युवक काँग‘ेसची मागणी
यवतमाळ,
1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहीम महाराष्ट्र सरकारने राबवली असून, या केंद्रावर येणार्‍या दिव्यांग नागरिकांना त्वरित लस देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा युवा काँग‘ेसचे जिल्हा सरचिटणीस ललित जैन यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.
 
ddddddgff_1  H
 
सरकारने या लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप किंवा पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. पण यवतमाळ शहरात काही लसीकरण केंद्रावर असे निदर्शनास आले की दिव्यांग व्यक्तींकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नोंदणी करणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता परतावे लागत आहे.
 
 
कोणताही दिव्यांग नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिव्यांग व्यक्तीची फक्त मोबाईल नंबर व ओळखपत्राद्वारे नोंदणी करून त्याच दिवशी लगेच लस देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.