चंद्रपूर व अहेरीत 3 प्राणवायू व लघु जीवनरक्षक जनसेवेत

    दिनांक :03-May-2021
|
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

चंद्रपूर, 
कोरोना विषाणुने पुन्हा एकदा सर्वत्र थैमान घातले आहे. रूग्णांना प्राणवायू व जीवनरक्षक यंत्र मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशात रूग्णसेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला असून, चंद्रपूर व अहेरी शहरात तीन प्राणवायू व लघु जीवनरक्षक दिले.
 
dddd_1  H x W:
 
चंद्रपूर व अहेरी येथे कोरोनाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवा भावनेतून चालणार्‍या संस्था व रूग्णालयाला प्रत्येकी 3 प्राणवायू व लघु जीवनरक्षक देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक रवींद्र भागवत यांच्या हस्ते ते दिले गेले. याप्रसंगी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष वसंत थोटे, सचिव आशिष धर्मपुरीवार यांची उपस्थिती होती. प्राणवायू व जीवनरक्षक डॉ. बेंडले यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, नगर कार्यवाह विनय आत्राम आदींची उपस्थिती होती.
 
 
तर, अहेरी येथे प्राणवायूची कमतरता भासू नये या उद्देशाने डॉ. अमोल पेशट्टीवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरीतर्फे 3 प्राणवायू जीवनरक्षक जिल्हा संघचालक गजानन राहुलवार यांच्या हस्ते दिले गेले. याप्रसंगी नगर कार्यवाह अभय भोयर, सहकार्यवाह क्षितीज कविराजवार, गणेश बोडावार उपस्थित होते.