यवतमाळात 18 ते 44 वयोगटात 910 जणांना लस

    दिनांक :03-May-2021
|
- जिल्ह्यात लसीकरणासाठी पाच केंद्र
यवतमाळ, 
महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण पाच केंद्र आहेत. यात यवतमाळ शहरात पाटीपुरा व लोहारा, तर उर्वरित तीन दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील 910 जणांना लस देण्यात आली असून सर्वाधिक 190 जणांचे लसीकरण पाटीपुरा केंद्रावर करण्यात आले. यानंतर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात 187, लोहारा केंद्रावर 185, दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 181 आणि पुसद उपजिल्हा रुग्णालयात 167 जणांनी लस घेतली.
 
fdgfd_1  H x W:
 
 
18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम selfregistration.cowin.gov.in किंवा COWin application किंवा रीेसूर डर्शीीं रिश्रिळलरींळेप अ‍ॅप किंवा पोर्टलवर नोंदणी  करावी. यानंतर फोटो ओळखपत्राचा उल्लेख करावा. फोटो ओळखपत्रामध्ये आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड, पॅन कार्ड आदींचा समावेश आहे. यानंतर लसीकरण केंद्र निवडावे व निवड केलेल्या केंद्रावरच दिलेल्या ठराविक वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून रांगेत नंबर लावावा व आपल्या क‘मांकानुसार लस घ्यावी. लसीकरण झाल्यानंतर मोबाईलवर संदेश प्राप्त होईल. दुसर्‍या डोजसाठी कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशीच प्रकि‘या करणे आवश्यक आहे.
45 वरचे वंचित राहू नयेत
18 ते 45 वयोगटाच्या लसीकरणात ज्यांना खरी गरज आहे ते 45 पेक्षा अधिक वयाचे नागरिक वंचित राहतात की काय असे लसीच्या तुटवड्यामुळे वाटू लागले आहे. सोमवार, 3 मे रोजी यवतमाळ शहरातील एकाही लसीकरण केंद्रावर या नागरिकांना देण्यासाठी लस उपलब्ध नव्हती. या नागरिकांना लस शोधण्यासाठी खूपच हेलपाटे घ्यावे लागले. हेलपाटे घेऊनही लक्ष मिळाली नाही ती नाहीच. विशेष म्हणजे, 45 च्या वरील नागरिकांमध्ये अनेक जण हे दुसरा डोज घेऊ इच्छिणारे होते. त्यांनाही डोज मिळू शकले नाहीत. या लस तुटवड्यामुळे दुसरा डोज राहून गेला आणि पुन्हा दोन्ही डोज घ्यावे लागले असे होऊ नये म्हणजे मिळवली.