जळीत हत्याकांड प्रकरणातील उलट तपासणीचे कार्य अपूर्ण

    दिनांक :03-May-2021
|
हिंगणघाट,
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी तृप्ति जाधव व फ्रांसिस परेरा यांची साक्ष झाल्याने बचाव पक्षाकडून उलट तपासणी करीता आज अँड भुपेन्द्र सोने न्यायालयात गैरहजर राहील्याने सरकारी विधीतज्ञ उज्वल निकम यांना आजही याप्रकरणी निराशा पदरी पडली.
 
tyryyu _1  H x
 
 
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे बचाव पक्षाचे अँड. सोने यांचे वतीने त्याचे सहकारी आज सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर अर्ज सादर करुन अँड. सोने यांनी प्रकृत्तीचे कारणामुळे गैरहजर आहे असे सांगितले, त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांची उलट तपासणीचे कामकाज होऊ शकले नाही.
 
 
दिनांक ३ व ४ मई ला होणारी सुनावणी अँड. सोनेच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाने ह्या प्रकरणातील पुढील तारीख ७ मे ठेवण्यात आली. विशेष सरकारी विधीतज्ञ उज्वल निकम विडीयों काँप्रेसिंग द्वारा कामकाजाची पाहणी करीत होते, पण त्याचे पदरी निराशा पडली, अँड. निकमचे वतीने ह्यामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अॅड. दिपक वैद्य यांनी सहकार्य केले.