जय मातादी ग्रुपतर्फे दारव्ह्यात मोफत अन्न पाकिटांची सुविधा

    दिनांक :03-May-2021
|
दारव्हा,
येथील कोविड दवाखान्यात भरती असलेल्या, प्रामु‘याने ग‘ामीण भागातील रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींची दरदिवशी दोनवेळच्या जेवणाची परवड होत असल्याचे चित्र आहे. दोनवेळच्या जेवणासाठी त्यांना साधारण 200 ते 250 रुपये खर्च येत आहे.
 
gghj _1  H x W:
 
अशा परिस्थितीत ‘जय मातादी ग‘ुप’ने पुढाकार घेऊन दारव्हा शहरातील कोविड दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांना व रुग्णासोबतच्या व्यक्तीला सकाळी व संध्याकाळी मोफत जेवणाचे पाकीट देण्यात येणार आहे. अन्नपाकिटांसाठी सकाळी 10 व संध्याकाळी 6 पर्यंत जय मातादी ग‘ुपच्या सदस्यांशी संपर्क करण्याचे आवाहन प्रकाश गोकुळे, गौरव पोपट, दिनेश कोठारी, अमोल घाटे, निलेश वाघ यांनी केले आहे.