आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्याकडून कोविड केंद्राला साहित्य

    दिनांक :03-May-2021
|
भुमराळा, 
लोणार तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोविड केअर सेंटर मधील साहित्य कमी पडत असल्याने खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी सेंटरचे व्यवस्थापक डॉ.भास्कर मापारी यांच्याकडून माहिती घेऊन ताबडतोब सदर चे साहित्य जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, निरज रायमुलकर यांच्या हस्ते लोणार कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ.भास्कर मापारी यांच्याकडे सुपूर्द केले.
 
dshd_1  H x W:
 
यामध्ये उत्कृष्ट प्रतीच्या गाद्या व रुग्णासाठी दररोज वाटप करण्यासाठी ड्रायफूटचे पाकिट स्वखर्चाने दिले. यावेळी जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी, नीरज रायमुलकर, तहसीलदार सैपन नदाफ, नगरपरिषदाचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, डॉ.शहा, डॉ.अनिल मापारी, डॉ. भास्कर मापारी, भगवान कोकाटे, गजानन मापारी, निखिल अग्रवाल, भगवानराव वायाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
50 गाद्या आणि 1000 काजुबदाम चे पाकिटे या साहित्यासोबतच येथिल कोविड सेंटरवर भरती असणार्‍या रुग्णासाठी दररोज पौष्टिक दुध सुध्दा देण्याचे नियोजन लवकरच आ. रायमूलकर यांच्या मार्गदर्शनात करनार असल्याचे प्रा.बळीराम मापारी यांनी सांगितले.