ममता बॅनर्जी यांचा ५ मे ला शपथविधी

    दिनांक :03-May-2021
|
कोलकाता,
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय झाला आहे. तर, शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे.
 
fhf_1  H x W: 0
 
 
याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या सर्वांची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. करोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून संथगतीने मतमोजणी सुरू होती.