जिल्ह्यातील चौघांच्या 15 वर्षे उत्तम सेवाभिलेखाची दखल

    दिनांक :03-May-2021
|
- 4 पोलिसांना महासंचालक पदक घोषित
बुलडाणा,  
सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या जिल्हा पोलिस दलातील 4 पोलिसांना शुक्रवारी महासंचालक सन्मान पदके जाहीर झाली. यामध्ये सपोनि गोकूळ सूर्यवंशी, शेगाव, पोलिस हवालदार राजू जवंजाळ, पोलिस हवालदार अविनाश भांबळे, पोलिस नायक गजानन आहेर यांच्यासह राज्यातील 799 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा पोलिस दलातील पोलिस महासंचालक पदक जाहिर झालेल्या पोलिसांचा जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.सेवेत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख, क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून दोषींविरुद्ध ठोस पुरावे जमा करणे, तसेच नैसर्गिक आपत्तीवेळी केलेली उत्तम कामगिरी करणार्‍या पोलिसांसह 20 वर्षे विनाअपघात उत्तम सेवाभिलेख, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखविणे, विशेष शाखेत उत्तम कामगिरी आणि प्रशंसनीय स्वरूपाचे अन्य व अत्युत्तम काम केल्याबद्दल अधिकारी आणि अंमलदारांनाही गौरविण्यात येणार आहे.
 
 
pol_1  H x W: 0
 
महाराष्ट्र दिनाच्या पृष्ठभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या अशा 799 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदके शुक्रवारी जाहीर करण्यात आली. सध्या कोरोनाच्या विस्फोटामुळे पदक वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. दरवर्षी 1 मे कामगार-दिनी पोलीस विभागात सलग 15 वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणाछया अधिकारी, कर्मचाछयांना शाबासकीची थाप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक पोलीस पदक देऊन सन्मान करतात. यावर्षी सपोनि गोकूळ सूर्यवंशी, शेगाव, पोलिस हवालदार राजू जवंजाळ, पोलिस हवालदार अविनाश भांबळे (एसीबी), पोलिस नायक गजानन आहेर यांची 15 वर्षे सातत्यपूर्ण सेवा केल्या बद्दल निवड करण्यात आली. मितभाषी, चेहछयावर स्मितहास्य आणि हाकेला धावणारे तसेच वेळप्रसंगी कुणालाही सहकार्य करणारे परंतु कर्तव्यकठोर अशा स्वभावामुळे या चौघांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्यामुळे आपल्या पोलीसी कामात त्यांनी कधीच कुचराई केली नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण 15 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यथोचित सन्मानास ते पात्र ठरले आहेत. त्याबद्दल सर्वांना अभिमान वाटतो अशा शब्दात शहरातील विविध मान्यवरांनी, आणि संस्थांनी तसेच मित्रपरिवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे आणि अभिमानास्पद कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.