ओलींची 10 मे रोजी शक्तिपरीक्षा

    दिनांक :03-May-2021
|
काठमांडू, 
सत्तेत राहण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली 10 मे रोजी संसदेत विश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी विश्वास मत प्रस्तावावरील मतदानासाठी 10 मे रोजी संसदेचे सत्र आयोजित करण्याचा आदेश दिला, अशी माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली.
 
intre_1  H x W:
 
नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची एकूण सदस्यसंख्या 275 असून, विश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी ओली यांना 136 मतांची गरज आहे. सध्या सभागृहातील चार सदस्य निलंबित आहेत. सत्तेत राहण्यासाठी विश्वास प्रस्ताव जिंकणे आवश्यक आहे, असे ओली यांनी रविवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात सांगितल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे. 10 तारखेला संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विश्वास प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विधि व न्याय मंत्री लीलानाथ श्रेष्ठ यांनी दिल्याचे वृत्त काठमांडू पोस्टने दिले आहे. संसदेचे हे सत्र एकाच दिवसाचे असेल, असे त्यांनी सांगितले.