धारणीत वादळासह पावसाची हजेरी

    दिनांक :03-May-2021
|
धारणी,
धारणी तथा चिखलदरा भागात सोमवारी दुपारनंतर सर्वत्र वादळ व अवकाळी पावसाने धडक दिल्याने हवेत गारवा निर्माण झाला. मेळघाटात अवकाळी पाऊस पण तुरळक प्रमाणात बरसला.
 
wqtret_1  H x W
 
सायंकाळी आकाशात अचानक ढगांची जमवा-जमव सुरू झाली आणि पाहता-पाहता जोराचा सोसाट्याचा वारा सुटला. वादळ आल्याने जंगलात अनेक झाडांची पडझड झाली. धारणीसह जवळपासच्या सर्व गावांमध्ये पाऊस आला. इतर कोणतीही नुकसानीची माहिती नाही. वाढत्या तापमानानंतर हवेत थंडपणा आलेला आहे.