शेतकर्‍यांना पीक कर्जवाटप त्वरित करा

    दिनांक :03-May-2021
|
- आ. डॉ. अशोक उईके यांची मु‘यमंत्र्यांकडे मागणी
राळेगाव,
कोविड19 च्या संसर्गामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. यातून कृषी क्षेत्रही सुटले नाही. यवतमाळ जिल्ह्यात शेतीवर उपजीविका असणार्‍यांची सं‘या मोठी आहे. यातच शेतकरी आत्महत्या हा या जिल्ह्याचा अत्यंत नाजूक विषय झाला आहे, असे आमदार डॉ. अशोक उईके यांनी मु‘यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. राळेगाव मतदारसंघात सिंचनाची शेती करणार्‍यांपेक्षा कोरडवाहू शेतीक्षेत्र मोठे आहे. राळेगाव तालुक्यात मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व बोगस बीटी बियाणे, सोयाबीनवर आलेली खोडअळी यामुळे उत्पन्न फारसे समाधानकारक झाले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
 
dhg_1  H x W: 0
 
 
तालुक्यातील शेतकरी बँकेचे कर्ज घेऊन शेती करतो. दरवर्षी त्या कर्जाचा भरणा करण्याचा प्रयत्नही करणारे शेतकरी आहेत. आता पुढील हंगामाकरिता शेतीची मशागत सुरू झाली आहे. शेतीसाठी लागणारे अर्थसाह्य कर्जाच्या स्वरूपात मिळविण्याकरिता शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांना पीककर्जाचे वाटप त्वरित करावे, अशी मागणी आ. डॉ. उईके यांनी मु‘यमंत्र्यांकडे केली आहे.
 
 
शेतकरी पीककजर्र् संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक बोलविण्यात आली होती. या वेळेस तालुक्यातील शेतकर्‍यांनी मागील वर्षी नियमित कर्ज परतफेड केले. परंतु त्यांना पुन्हा कर्ज मिळाले नाही. तीन-चार महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांचे ‘थंब ऑथरायझेशन’ होऊनही कर्जमाफीचे पैसे मिळाले नाही. शेतकर्‍यांना कर्जसंदर्भात अनेक अडचणी येत असल्याने व बँकेचे अधिकारी अडचणी समजून घेत नसल्याने कर्जपुरवठा होत नाही. आपण तालुक्यातील सर्वच बँकांचा कर्ज पुरवठ्यासंबंधी आढावा घ्यावा तलाठी वर्गाकडून व कृषी सहायकांकडून गाव पातळीवरील शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेऊन जगाच्या पोशिंद्याला न्याय देण्याचे काम आपण अधिकारी वर्गाने करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
 
 
तसेच शासनस्तरावरून या संदर्भात कुठले आदेश आहेत याचीही माहिती घ्यावी. यावेळी आ. डॉ. उईके यांनी शेतकर्‍यांना त्वरित पीककर्ज मिळावे, बोगस बियाणे विक‘ी करणार्‍या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. कारण यामुळे दुबार पेरणी करावी लागत असून बियाण्यांचा खर्च वाढतो, शेतकरी आत्महत्या वाढतात. कारण तो आर्थिक ताण सर्वसाधारण शेतकरी सहन करू शकत नाही. यासाठीच मु‘यमंत्र्यांना आपण या सर्वच प्रश्नांकडे लक्ष देण्यासंदर्भात विनंती करणार आहोत. शेतकर्‍यांच्या संबंधित सर्वच प्रश्नांबाबत आपण पावले उचलावी, अशा सूचना आ. डॉ. उईके यांनी दिल्या. यावेळी आढावा बैठकीला आमदार डॉ. अशोक उईके, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार रवींद्र कानडजे, तालुका कृषी अधिकारी मनीषा गवळी, पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, भाजपा शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर उपस्थित होते.