कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

    दिनांक :03-May-2021
|
- 903 नवे बाधित, 602 बरे
- 21 रुग्णांचा झाला मृत्यू
अमरावती, 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या रविवारी थोडी कमी झाल्यानंतर सोमवारी पुन्हा वाढली. 903 नवीन रूग्णांची नोंद झाली आणि 21 मृत्यू झाले. 602 रूग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत 68 हजार 404 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 8,515 रूग्ण क्रियाशील असून त्यातील 7 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. 6,526 गृह विलगीकरणात आहे. उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत 58 हजार 887 रूग्ण बरे झाले आहे. तो दर 86.09 टक्क्यांवर आला आहे.
 
fdgh_1  H x W:
 
जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अमरावती जिल्ह्यातल्या 19 व अन्य जिल्ह्यातल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या मृतकांमध्ये अंजनगाव शहापूर येथील 65 वर्षीय पुरुष, यशोदा नगर येथील 85 वर्षीय पुरुष, धनज येथील 60 वर्षीय पुरुष, एमआयडीसी रोड येथील 56 वर्षीय पुरुष, तळेगांव दशासर येथील 45 वर्षीय पुरुड, दर्यापूर येथील 52 वर्षीय महिला, भातकुली येथील 75 वर्षीय पुरुष, परसापूर येथील 47 वर्षीय महिला, राम नगर येथील 73 वर्षीय पुरुष, खडकी आष्टी येथील 66 वर्षीय पुरुष, तिवसा येथील 52 वर्षीय महिला, देऊरवाडा येथील 65 वर्षीय पुरुष, वरुड येथील 70 वर्षीय पुरुष, कुर्‍हा येथील 50 वर्षीय पुरुष, वरुड येथील 54 वर्षीय पुरुष, पिंपळखुटा येथील 65 वर्षीय पुरुष, बेनोडा वरुड येथील 65 वर्षीय पुरुष, नांदगांव खंडेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष, वडाळी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यातल्या मृत्यूची नोंद वेगळी घेण्यात आली आहे. नव्याने बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे.
 
मृत्यूसंख्या एक हजार पार
जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णाची पहिली नोंद 4 एप्रिल 2020 रोजी झाली होती. मृत्यूनंतर सदर रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत 1002 जणांचा मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. ते प्रमाण सुरूवातील 2 टक्के होते. त्यानंतर ते कमी झाले. विद्यमान स्थितीत तो दर 1.46 टक्क्यांवर आहे. दाखविण्यात येणार हा दर वर्षभरातल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आहे. पण, गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे बाधित होणार्‍यांची संख्या जशी वाढली आहे, तशीच मृत्यू संख्येतही वाढ झाली आहे.