मोठ्या घसरणीतून सावरला शेअर बाजार

    दिनांक :03-May-2021
|
मुंबई,
सकाळची सुरुवात 600 अंकांच्या घसरणीने झाल्यानंतर आणि दुपारच्या सत्रात ती आणखी वाढून 750 पेक्षा जास्त स्तरापर्यंत झाल्यानंतर काही कंपन्यांनी मुंबई शेअर बाजाराला सावरले. तथापि, या कंपन्यांना संपूर्ण घसरण रोखण्यात अपयश आले.
 
maha_1  H x W:
 
दुपारपर्यंत शेअर बाजारात केवळ नफा कमावण्याचे सत्र सुरू होते. मात्र, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाल्याने घसरण थांबली. दिवसभराच्या उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 63.84 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 48,718.52 या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 3.05 अंकांच्या घसरणीसह 14,634.15 या स्तरावर बंद झाला.