नियमाचे उल्लंघन करणार्‍या दुकानांना लावले सील

    दिनांक :03-May-2021
|
 
acc _1  H x W:
 
रिसोड,  
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापारी किशोर गिरजाप्पा कोठुळे यांचे जय लखमा नावाचे दुकान कायद्याचे उल्लंघन करून सुरू असल्याचे आढळून आल्याने संयुक्तरीत्या विद्यमान तहसीलदार मुख्याधिकारी व ठाणेदार यांनी कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड ठोकण्यात आला. दुकानला सील लावून पुढील आदेशा पर्यंत दुकान उघडता येणार नसल्याची ताकीद देण्यात आली. ही कारवाई तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे व ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. या कारवाईमुळे रिसोड शहरात अर्धे शटर उघडे ठेवून व्यापार करणार्‍या दुकानदाराचे धाबे दणाणले सोबत फोटो आहे.