कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या

    दिनांक :03-May-2021
|
गडचिरोली,
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असुन दिवसेंदिवस राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यातहि रुग्ण संख्या वाढत असुन प्रशासन प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करीत आहे. करिता जिल्ह्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेवुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले. शनिवार दि.१ मे रोजी स्थानिक गोकुलनगर वार्डातील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेतील लसीकरण केंद्रावर प्रमोद पिपरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दुसरी लस घेतली.प्रथम लस घेतली होती.
 
 
rtv _1  H x W:
 
तसेच कोरोना प्रतिबंधात्मक हि लस पुर्णतः सुरक्षित असुन या लस विषयी असलेला गैरसमज जनतेने दुर करून प्रत्येक नागरिकांनी हि लस घ्यावी. मास्कचा नेहमी वापर करावा,अत्यावश्यक कामानिमित्तच घराच्या बाहेर पडावे व घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहनही प्रमोद पिपरे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, नगरसेविका निताताई उंदिरवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमा गेडाम, परिचारिका डोंगरे,कोतपल्लीवार,टेकाम, सविता नरोटे,अनुराग पिपरे उपस्थित होते.