त्या उंटाचा अखेर मृत्यू ।

    दिनांक :03-May-2021
|
- अनेक दिवसांपासून होता जखमी स्थितीत
नागपूर, 
अमरावतीपासून अवघ्या चाळीस किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून असलेल्या उंटाला नागपुरात आणून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. माहेश्वरी अ‍ॅनिमल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने या उंटाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु दुर्दैवाने या उंटाचा मृत्यू झाला.

FDHHG_1  H x W: 
 
भटकंती करणाèया बंजारा समूहांची संख्या बèयापैकी आहे. कुणाच्यातरी मालकीचा हा उंट असावा आणि वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याने त्याला मरण्यासाठी सोडून दिला गेला, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. बराचकाळ तो तसाच जखमी स्थितीत पडून होता. घटनास्थळी असणाèयांनी मुंबईतील एका संघटनेकडे मदत मागितली. त्या संघटनेने शहरातील प्राणीप्रेमी करिष्मा गलानी यांचे नाव सुचविले. त्यानंतर गलानी यांच्याशी संपर्क झाल्यावर गलानी यांनी तात्काळ अमरावतीच्या हेल्प फाउंडेशनचे रत्नदीप वानखेडे आणि संकेत ठाकूर यांच्यासोबत संपर्क साधून माहिती घेण्याची सूचना केली.
 
 
त्यांनी घटनास्थळी जाउन पाहिले असता हा उंट आठ दिवसांपासून मरणासन्न अवस्थेत पडून असल्याचे समजले. गलानी यांनी जखमी उंटाला उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. माहेश्वरी अ‍ॅनिमल वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अजय माहेश्वरी यांच्या सहाय्याने या उंटाला अंबाझरीतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणून उपचार सुरु झाले. उंटाच्या पायाला इन्फेक्शन झाल्याने त्याचा पाय कापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या उंटावर यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. मयूर काटे, डॉ. शिरीष उपाध्ये यांनी केली. त्याने उपचाराला देखील साथ दिली. परंतु अनेक दिवसापासून जखमी अवस्थेत असल्याने या उंटाचा शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसाने मृत्यू झाला.