जिल्ह्यात कोरोनाबाधितांची घटती संख्या दिलासादायक

    दिनांक :03-May-2021
|
- केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही घेतली दखल
भंडारा, 
दोन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची तसेच मृतकांची संख्येत घट आली असल्याने जिल्हावासीयांसाठी काहीसा दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना व नागरिकांनी दाखविलेल्या संयमामुळे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही घेतली असून सुधारणा होत असलेल्या जिल्ह्यांत भंडाऱ्याचा उल्लेख केला. सोमवारी 1099 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.64 टक्के झाले आहे. तर 550 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
 
ghhfd_1  H x W:
मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविले जाते. सतत वाढत असलेली बाधिताची व मृतकांची संख्या पाहता नागरिकांसह आरोग्य प्रशासनही हादरून गेले होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊन रुग्णांना सोयी सुविधा अपूèया पडू लागल्या होत्या. परंतु जिल्हा प्रशासनाने नियोजनबध्दरित्या परिस्थिती हाताळून विविध उपाययोजना केल्या. याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. आता बाधितांपेक्षा बरे होणाèयांची संख्या वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही याची दखल घेतली असून दिल्ली येथून पत्रकारांना माहिती देताना जिल्ह्यातील घटत्या रुग्णसंख्येचा उल्लेख केला. सोमवारी 1166 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 550 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले.
 
 
यामध्ये भंडारा तालुक्यातील 253, मोहाडी 30, तुमसर 49, पवनी 22, लाखनी 108, साकोली 71 व लाखांदुर तालुक्यातील 17 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 3 लाख 39 हजार 991 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 52554 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले. आतापर्यंत 41855 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून 9809 क्रियाशील रुग्ण आहेत. सोमवारी कोरोनाच्या 10 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची एकूण संख्या 890 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.64 टक्के असून मृत्युदर 1.69 टक्के एवढा आहे.