बहुचर्चित मलकापूर बायपास रिंग रोड लढ्याला सहा वर्षानंतर मिळाला न्याय

    दिनांक :03-May-2021
|
बुलडाणा, 
आझाद हिंद संघटनेच्यावतीने उभारण्यात आलेल्या बहुचर्चित रिंग रोडच्या लढ्याला अखेर 6 वर्षानंतर यश मिळाले. फेब्रुवारी 2015 मध्ये स्थानिक मलकापूर बायपास रिंग रोड बाराशे मीटर साठी एक कोटी पंधरा लाखाचे मोठे इस्टिमेट पारित झाले. तत्कालीन नगराध्यक्षांनी तयार केलेल्या या रोडवर 8 दिवसानंतरच खड्डे पडले आणि रिंग रोडचे काम निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी नगरपरिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी दिल्या.
 
fffffgb_1  H x
 
या तक्रारींची कोणतीही दखल संबंधित विभागाने न घेतल्यामुळे आझाद हिंद संघटनेच्या वतीने अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे व पत्रकार सुधाकर अहेर यांनी रिंग रोडच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री महोदयांनी बुलडाणा जिल्हाधिकारी आणि शासकीय बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सदर प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
 
 
त्यानंतरही संबंधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आझाद हिंद संघटनेच्यावतीने सतत सहा वर्ष आक्रमक आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देत शासन प्रशासनाला नमते केले. त्यानमूळेच कार्यकारी अभियंता यांनी सदर रोडची इस्टिमेट नुसार चौकशी केली असता असंख्य चाचण्या केलेल्या नसल्याचे व इस्टिमेटनुसार काम न झाल्याचे अहवाल जिल्हाधिकारी बुलडाणा यांना सादर केले. त्यानुसार संबंधितांवर दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक उपविभागीय अधिकार्‍यांना दिली. त्यानुसार दोषारोपही सिद्ध झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला शरणागती पत्करावी लागली आणि इस्टिमेट नुसार रिंग रोड पुनर्बांधणी करण्याचे त्यांनी मान्य केले. सद्यस्थितीत रिंग रोड 40 ते 50 लाख रुपये खर्च करून बुलडानेकरांच्या सेवेत आज रोजी खर्‍या अर्थाने लोकार्पित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह अ‍ॅड.सतिश रोठे व सुधाकर अहेर यांच्या प्रयत्नाला अखेर न्याय मिळाला.