कोरोना लढवय्यांचा सत्कारही महत्त्वाचा- नगराध्यक्ष तराळे

    दिनांक :03-May-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
गेल्या एक वर्षांपासून प्रत्येक जण आपआपल्यापरिने कोरोनासोबत झगडत आहेत. त्याचे परिणामही दिसत आहेत. दरम्यान, कोरोना काळात अनेकांनी मदतीचा हात दिला. त्यांच्याही पुढे जाऊन काहींनी सेवा दिली. त्या सेवेकरांचा सत्कारही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले.
 

dha1_1  H x W:  
 
कामगार दिनाचे औचित्य साधून वर्धा नपच्या वतीने कोरोना काळात सातत्याने कार्यरत स्थानिक डॉक्टर, शिक्षक, नप कर्मचारी, आशा वर्कर व सामाजिक संस्थांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी विपिन पालीवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी नप अध्यक्ष अतुल तराळे हस्ते निलेश गुल्हाणे यांना उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.