बाधितांची संख्येत घट दिलासादायक

    दिनांक :03-May-2021
|
- 973 बाधित, तर 993 कोरोनामुक्त
- 22 जणांचा मृत्यू

चंद्रपूर, 
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात दैनिक रूग्णवाढीच्या तुलनेत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तशी नोंद जिल्हा आरोग्य विभागात आहे. सोमवारी जिल्ह्यात 973 नव्या बाधितांची भर पडली असली तरी, 993 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. जिल्ह्यात 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 63 हजार 868 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 46 हजार 125 झाली आहे. सध्या 16 हजार 767 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 87 हजार 23 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 लाख 18 हजार 795 नमुने नकारात्मक आले आहेत.

fgt_1  H x W: 0 
 
मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 52 वर्षीय महिला, बालाजी वार्ड येथील 58 वर्षीय पुरुष, एकोरी वार्ड येथील 55 वर्षीय महिला, भिवापुर वार्ड येथील 52 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 60 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 61 वर्षीय पुरुष, नगीनाबाग येथील 51 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील 65 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील वाढोना येथील 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, मंगरूळ येथील 60 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 50 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील माजरी येथील 46 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 72 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील केळझर येथील 70 वर्षीय पुरुष, वणी-यवतमाळ येथील 57 वर्षीय पुरुष, भंडारा तालुक्यातील साकोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 976 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 904, तेलंगणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 29, यवतमाळ 28, भंडारा 9, गोंदिया 1 आणि वर्धा 1, नागपूर येथील 2 बाधितांचा समावेश आहे. सोमवारी बाधित आलेल्या 973 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 390, चंद्रपूर तालुका 38, बल्लारपूर 81, भद्रावती 99, ब्रम्हपुरी 41, नागभीड 38, सिंदेवाही 25, मूल 57, सावली 33, पोंभूर्णा 13, गोंडपिपरी 30, राजुरा 05, चिमूर 06, वरोरा 72, कोरपना 17, जिवती 10 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.