जवानाने रचला पत्नीच्या हत्येचा कट

    दिनांक :03-May-2021
|
- आई व बहिनीने केली हत्या
- कोब्रा बटालियनच्या चितापूर वसाहतीमधील घटना
भंडारा, 
कोब्रा बटालियनमध्ये कार्यरत जवानाच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीचा हुंड्यासाठी आई व बहिनीने गळा दाबून खून केल्याची घटना चितापूर येथील कोब्रा बटालियनच्या वसाहतीमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी जवानासह त्याची आई व बहिणीविरुद्ध कारधा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रायन्ना शिवरुद्र अप्पा नावी (26), शोभा शिवरुद्र नावी (54) आणि रुपा शिवरुद्र नावी (18) अशी आरोपींची नावे आहेत. तर भारती रायन्ना नावी (21) असे मृत महिलेचे नाव आहे.
 
fgtgg_1  H x W:
भंडारा तालुक्यातील चितापूर येथे कोब्रा बटालियनची वसाहत आहे. या बटालियनमध्ये कार्यरत जवान रायन्ना नावी हा सध्या छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे कर्तव्यावर आहे. तर त्याची पत्नी भारती, आई शोभा आणि बहिण रुपा हे चितापूर येथील सदनिकेत राहत होते. 29 एप्रिल रोजी रोजी भारतीचा मृतदेह सदनिकेत आढळून आला होता. भारतीच्या मृत्यूमुळे अनेक शंकांना उधान आले होते.
 
 
याप्रकरणी कारधा पोलिसांनी मर्ग दाखल करून चौकशी केली सुरू केली. चौकशी दरम्यान रायन्ना ह्याच्या सांगण्यावरून त्याची आई शोभा आणि बहिण रुपा यांनी हुंड्यासाठी भारतीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला व मारपीट करून भारतीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी 1 मे रोजी सुनील नागप्पा हम्पन्नावर (43) रा. बसवनगल्ली जि. बेळगाव यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी रायन्ना नावी, शोभा नावी, रुपा नावी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 302, 304 (ब), 506, 34 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक परशुरामकर करीत आहेत. हे सर्व सदस्य कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील परकन्नाहेट्टी येथील रहिवासी आहेत.