विनयभंग प्रकरणी तीन वर्षे कारावास

    दिनांक :03-May-2021
|
- यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यांंतर्गत घटना
यवतमाळ, 
पीडितेच्या घरी जाऊन तिचा हात पकडून तिचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 9 फेब‘ुवारी 2018 रोजी घडली. या प्रकरणी पीडितेने ग‘ामीण पोलिस ठाण्यात तक‘ार दाखल केली होती. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश चव्हाण यांनी आरोपीला पोक्सो कलम 8 अंतर्गत 3 वर्षे कारावास व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
 
rgthg _1  H x W
 
 
संध्याकाळी पीडिता घरी एकटीच असताना आणि तिची आई हापशीवर पाणी भरण्याकरिता गेली असताना आरोपी आकाश देवानंद थुल (वय 18, कार्ली, तालुका यवतमाळ) याने घराच्या अंगणात जाऊन पीडितेचा हात पकडून विनयभंग केला व मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्याशी लग्न न केल्यास मी तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकून तुला जाळून टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने यवतमाळ ग‘ामीण पोलिस ठाण्यात तक‘ार केली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध कलम 354 अ, ड, 448,506 भादंवि व 8, 12 लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 आणि अन्वये गुन्हा नोंद करून तपास तपास केला. तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
 
 
या प्रकरणी सरकारच्यावतीने एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच बचाव पक्षाकरिता 2 साक्षी नोंदविल्या. या प्रकरणात न्यायालयाने पीडिता व तिच्या आईचे बयाण, साक्षी व इतर पुरावे ग‘ाह्य मानून आरोपीला शिक्षा ठोठावली. या प्रकरणात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजू नेवारे यांनी, तर सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील संदीप दर्डा यांनी काम पाहिले.