आज जिल्ह्यात आढळले 728 कोरोनाबाधित, 8 रूग्णांचा मृत्यू

    दिनांक :03-May-2021
|
बुलडाणा, 
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2003 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1275 अहवाल कोरोना नकारात्मक असून 728 अहवाल बाधित प्राप्त आले आहे. प्राप्त बाधित अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 568 व शीघ्र तपासणीमधील 160 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 452 तर शीघ्र तपासणीमधील 823 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1275 अहवाल नकारात्मक आहेत.
 
ghghgh_1  H x W
 
उपचारादरम्यान केसापुर, ता.बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 55 वर्षीय पुरुष, खंडाळा म.ता.चिखली येथील 42 वर्षीय पुरुष, पोरज ता.खामगाव येथील 71 वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील 55 वर्षीय पुरुष, राहुड ता.खामगाव येथील 80 वर्षीय पुरुष, कुंबेफळ ता.खामगाव येथील 85 वर्षीय पुरुष, निमगाव ता.नांदुरा येथील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज 1135 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय नियमांप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
 
 
आजपर्यंत 364487 अहवाल नकारात्मक प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 59765 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना नकारात्मक असल्यामुळे त्यांना वैद्यकीय नियमाप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 59765 आहे. आज रोजी 5710 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण नकारात्मक अहवाल 364487 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 66710 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 59765 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय नियमाप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6578 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 427 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.