दोन दारु तस्करांना अटक

    दिनांक :03-May-2021
|
- रेल्वे पोलिसांची कारवाई
गोंदिया,
छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे अवैधरित्या दारूची वाहतूक करणार्‍या दोन तस्करांना रेल्वे पोलिसांनी अटक केल्याची घटना शनिवार 1 मे रोजी उघडकीस आली. टुमनलाल राजेंद्र देशलहर (27) व राम रामना राव (35) दोघेही रा. दुर्ग (छ.ग.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
fghghggh_1  H x
 
येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर सिकंदराबाद - रायपूर एक्सप्रेस रेल्वगाडीत दोन युवक वजनदार कॉलेजबॅग घेऊन सामान्य बोगीत बसत असल्याचे दिसून आल्याने रेल्वे पोलिसांनी दोघांना आवाज दिले असता दोघांनीही बॅग रेल्वेगाडीच्या बाहेर फेकून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. यावेळी त्यांची चौकशी केली असता गोंदिया येथून देशी दारू खेरदी करून दुर्ग येथे विक्री करण्यासाठी नेत असल्याचे कळले. दरम्यान त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता 4 हजार 680 रुपये किमतीच्या 90 मिलीच्या 180 बाटल्या बॅगमध्ये आढळल्या. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.