दुचाकी झाडावर आदळली भावाचा मृत्यू, बहीण जखमी

    दिनांक :03-May-2021
|
घाटंजी, 
भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने भावाचा मृत्यू झाला असून बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना घाटंजी शहरातील नर्सरीजवळ घडली. संदीप विलास कोयरे (वय 28, कुर्‍हाडुमणी ता. आर्णी) असे मृत भावाचे नाव असून बहीण सोनू कोयरे ही जखमी असून तिच्यावर यवतमाळातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
gggg_1  H x W:
 
आर्णी तालुक्यातील डुमणी कुर्‍हा येथील 28 वर्षीय युवक संदीप कोयरे आपली बहीण सोनू हिच्यासोबत दुचाकी क‘मांक एमएच32 एस4080 ने आमडी येथील नातेवाईकाला भेटून गावाकडे परत येत होता. अशातच घाटंजी शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर संदीपची भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात दोघेही दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेवून संदीप आणि सोनू यांना घाटंजी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
 
 
यावेळी डॉक्टरांनी संदीप कोयरे याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या सोनू कोयरे हिला यवतमाळातील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांकरिता दाखल करण्याचा सल्ला दिला. या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात मृत दुचाकीस्वार संदीप कोयरे याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे नोंद केले आहे.