जिप उपाध्यक्ष येरावार यांच्या पुढाकाराने सोनेगाव (आ.) येथे लसीकरण

    दिनांक :03-May-2021
|
तभा वृत्तसेवा
देवळी,
सामाजिक बांधिलकीतून जिप उपाध्यक्ष वैशाली येरावार यांच्या पुढाकाराने देवळी पासून 7 किमी अंतरावर असलेल्या सोनेगाव (आ.) येथे 1 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोना लसीकरण आणि चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आबाजी महाराज देवस्थानमध्ये आयोजित या कार्यक्रमात 30 जणांनी लसीकरण करून घेतले. याप्रसंगी गावातील 55 जनांची अन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी 7 कोरोना बाधित आढळले. 37 आरटीपीसिआर चाचणी पैकी दोघांचे अहवाल कोरोना बाधित असल्याचे निदान झाले.
 

dha_1  H x W: 0 
 
जिप उपाध्यक्ष येरावार यांनी गावातील 260 व्यक्तींनी लसीकरण करून घेतल्याची माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता असल्याचे म्हटले. सोनेगाव हे गृहगाव असल्याने जिल्हा परिषद आणि आबाजी महाराज धर्मार्थ दवाखाना यांच्या सहकार्याने सोनेगावाला कोरोनामुक्त करण्याचा चंग त्यांनी बोलून दाखविला. यावेळी आबाजी महाराज देवस्थान कमेटीचे अध्यक्ष जयंत येरावार, विश्‍वस्त अरुण दाणी, प्रल्हाद केणे, अरविंद दाणी, विठ्ठल पांडे, सरपंच वनिता डफरे, उपसरपंच अस्मिता बोबडे, सदस्य गंगाधर राऊत, अमोल कोवे आणि योगेश नेरकर हे उपस्थित होते.