जामठी ग्रापं.च्या वतीने मुखच्छादन वाटपासह लसीकरणाला सुरू

    दिनांक :03-May-2021
|
बुलडाणा, 
जामठी येथील ग्रामपंचायतच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनोज दांडगे बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली 30 एप्रिल रोजी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, कर्मचारी व आरोग्यसेवक यांच्या वतीने गावामध्ये (निलकंठेश्वर नगर) येथे एन-95 चे मुखच्छादन व विषाणूनाशकाचे वाटप रामदास तायडे, सुभाष तायडे व गजानन भगवान तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.  
 

dfff _1  H x W: 
 
त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागले आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील जामठी गावात मनोज दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नवोउपक्रम सुरूच असतात. 30 एप्रिलला 70 व्यक्तींनी लस घेऊन लसीकरणाला सुरुवात केली. लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत गावात निलकंठेशेवर नगर येथे मुखच्छादन व विषाणूनाशकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनोज दांडगे, बिलाल गायकवाड, कौतिकराव नरोटे, मनोहर तायडे, सुभाष तायडे, गजानन तायडे, रामदास तायडे, रामेश्वर तायडे, रमेश पाटील तायडे, तेजराव रावळकर, बाळासाहेब तायडे, सलीम खा, कलिम तडवी, विशाल तायडे, गणेश पवार, विनोद रावळकर, विनोद तायडे आदींची उपस्थिती होती.