वसंत हमंद यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

    दिनांक :03-May-2021
|
हिंगणघाट,
वंजारी समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा थलसेनेचे माजी सैनिक वसंत हमंद यांची वंजारी सेवा संघ, वर्धा जिल्हाध्यक्षपदी निवड़ करण्यात आली. आमदार समीर कुणावर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, वंजारी समाज विदर्भ अध्यक्ष प्रा. जितेंद्र केदार, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल कहाळे, वासुदेव घुगे, सुर्यकांत आखाडे, लक्ष्मण भारस्कर, अशोक साठे, राजु खांड़रे, दिगाम्बर खांडरे, निलेश नव्हाते आदींनी वसंत हमंद यांचे अभिनंदन केले असून वंजारी समाजातील वंचित लोकांना प्रगतीचे कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

gthhh_1  H x W: 
 
 
वसंत हमंद सीमेवर लढणारे सैनिक म्हणून सेवेतील अवकाशानंतर सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यानी भारत सरकारकडून युरोप खंडात यूनाइटेड नेशनपीस कीपिंग फ़ोर्समधे सुद्धा सेवा दिली आहे. त्यांची निवड राहुल जाधवर , संस्थापक अध्यक्ष, वंजारी सेवा संघ यानी नुकतीच एका पत्रकाद्वारे केली.