अभाविप कार्यालयावर गुंडांचा हिंसक हल्ला

    दिनांक :03-May-2021
|
- कार्यकर्त्यांना मारहाण
- पुतळे, मूर्तींची तोडफोड
 
नागपूर, 
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच तृणमूल काँग‘ेसची हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी बंगालमध्ये उघडपणे दिसून आली असून आज सोमवारी तृणमूलच्या 15-20 गुंडांनी कोलकाताच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम बंगाल प्रांताच्या कार्यालयावर ह‘ा केला आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना शिवीगाळ, मारहाण करीत प्रचंड तोडफोड केली.

FDG_1  H x W: 0 
  
 
यावेळी कार्यालयामध्ये उपस्थित राष्ट्रीय सह-संघटन मंत्री श्रीनिवास, क्षेत्रीय संघटन मंत्री गोविंद, सह-क्षेत्रीय संघटन मंत्री अंशु शेखर शील, केंद्रीय कार्यसमिती सदस्य सुमनचंद्र दास आणि इतर कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग‘ेसच्या गुंडांनी ह‘ा केला तसेच कार्यालयामध्ये ठेवलेल्या देवी काली आणि हनुमान यांच्या मूर्ती फोडल्या. यासह या गुंडांनी रवींद्रनाथ टागोर, श्यामा प्रसाद मुखर्जी, सुभाषचंद्र बोस आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमा लाथा मारून फोडल्या आणि कार्यालयाचे नुकसान केले.
 
 
यावेळी ते धमकी देत, ‘पराभवामुळे ममता बॅनर्जी अस्वस्थ झाल्या आहेत आणि यासाठी जबाबदार असणार्‍यांना आता बंगाल मध्ये राहू देणार नाही’. असे म्हणत होते. काल पासून तृणमूल काँग‘ेसचे गुंड हल्ल्याची तयारी करीत होते आणि रात्री जवळपास 150 गुंड अभाविप प्रांत कार्यालयाच्या बाहेर दुचाकी घेऊन फिरताना दिसले. अभाविप कार्यालयाभोवती 100 हून अधिक गुंडांनी वेढा घालता होता अशी माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली. रविवारी पासून ममता बॅनर्जी यांचे गुंड विरोधकांच्या मागावर होते, आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यापासून ते ह‘ा करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या प्रयत्नात आहेत.
 
 
दीर्घ संघर्षासाठी तयार रहा : निधी त्रिपाठी
तृणमूलच्या गुंडांनी केलेल्या आमच्या कार्यालयावरील हिंसक हल्ल्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते सुरक्षित आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मु‘यमंत्री आणि त्यांच्या गुंडांनी ज्या प्रकारचे हिंसक वर्तन दर्शविले आहे ते अत्यंत निंदनीय आहे. आगामी काळात एकजूट राहून आपली सुरक्षा ध्यानात ठेवून राष्ट्रवादाची मशाल तेवत ठेवायची आहे. आगामी काळात बंगालमध्ये परिस्थिती कशी होणार आहे याचे उदाहरण ममता आणि तिच्या गुंडांनी दाखवलेच आहे म्हणून आपल्याला आता दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे लागेल, असे मत अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
 
 
एकीकडे निवडणूक निकाला नंतर लोकशाहीच्या बाता मारायच्या आणि निकालाच्या दुसर्‍याच दिवशी अभाविप कार्यालयावर ह‘ा करत गुंडाराज दाखवून द्यायचा. ममता दीदी ने हे असले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे बंद करावे, अशी प्रतिकि‘या अभाविप विदर्भ प्रदेश पदाधिकारी अखिलेश भारतीय यांनी व्यक्त केली.