सामुदायिक आरोग्य अधिकार्‍यांचे कामबंद आंदोलन

    दिनांक :03-May-2021
|
आंजी(मोठी) ,
सामुदायिक आरोग्य अधिकार्‍यांच्या विविध प्रश्‍नांना घेऊन आज 3 रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. अधिकार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आले.
 
gfhh_1  H x W:
 
पवनार येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी उत्कुष्ट काम करीत असताना त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने त्रास देेत आहेत. कोरोनासह आरोग्य विषय अभियानात पवनार आघाडीवर असातान अधिकार्‍यांना मानसिक त्रास देणे योग्य नसून आम्ही त्याचा निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
 
 
आंदोलनात उत्सव शेंडे, उपाध्यक्ष निता चन्ने, सागर बोंबले, संदीप लेकुरवाळे, विणा वासनीक, अक्षय इंगळे सहभागी झाले होते तर प्रा. आ. केंद्र आंजी मो अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील सर्व समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी एकत्र येऊन डॉ. रश्मी कपाळे यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात निषेध केला. यावेळी डॉ. शैलजा काळे, डॉ. महेंद्र डांगे, डॉ. रश्मी कपाळे पवनार, डॉ. आश्‍लेषा बल्लाळ, वैशाली आसोले महाकाळ, पूनम पाली कामठी, दक्षता ढोके पेठ, धनश्री कोरडे मांडवा सहभागी झाले होते.