तरुण पिढीने लसीकरणाला प्राधान्य द्यावे- सभापती माटे

    दिनांक :03-May-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
केंद्र सरकार गेल्या वषीपासून कोरोनासोबत दोन हात करण्यात आघाडीवर आहे. यावर्षी दुसरी लाट येताच लसीकरणासारखे महत्त्वाचे पाऊल टप्प्याटप्याने उचलण्यात आले. आता 18 वर्षांवरच्यांना लसीकरण करण्यात येत आहे. तरुण रक्त असल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. परंतु, स्वत:, परिवार आणि समाजाची जबाबदारी म्हणून तरुण पिढीने लसीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन जिपच्या शिक्षण व आरोग्य सभापती मृणाल माटे यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जातो आहे. अश्या परिस्तिथीमध्ये स्वतःच स्वतःचे व आपल्या परिवाराचे रक्षण करणेही काळाची गरज आहे.
 

sdff_1  H x W:  
 
नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्याकरिता विनाकारण घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर राखावे, मुखच्छादनाचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे करोना रोखण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आता आपण कोरोना संक्रमणाच्या अशा टप्प्यावर आहोत जिथे आपल्याला उपाययोजनांत अधिकाधिक सुरक्षा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण लस घेऊन कोरोनाचे संकट कमी करण्यास मदत करणे आवश्यक आहे. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरु झाले आहेत कृपया आपण आपले रेजिस्ट्रेशन सेल्फ रजीस्ट्रेशन कोविण गर्व्हेरमेंट डॉट इन या लिंक वर करावे आणि आपले नोंदणी करून घ्यावी, असेही मृणाल माटे यांनी कळवले आहे.